Monsoon Nail Care Tips
|

Monsoon Nail Care Tips – भाग 2 : पावसाळ्यात पायांच्या नखांची काळजी कशी घ्याल..?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Monsoon Nail Care Tips) पावसाळ्यात रोगराई आणि साथीच्या रोगांसह पायाच्या नखांचे आरोग्य धोक्यात येते. साचलेलं पाणी, ओली चप्पल, चिखल यामुळे पायाच्या नखांमध्ये संसर्ग होण्याची भीती असते. त्यात जर आधीपासूनच नखांना काही संसर्ग झाला असेल किंवा नखांमध्ये एखादी जखम झाली असेल तर फारच जपावे लागते. त्यामुळे पावसाळा आला कि पायाच्या नखांची काळजी घेणे अधिक महत्वाचे होते.

Monsoon

आपण भाग १ मध्ये पावसाळ्यात पायाच्या नखांचे आरोग्य बिघडवणारी कारणे तसेच संसर्गाची लक्षणे जाणून घेतली. यानंतर आता आपण भाग २ मध्ये पायाच्या नखांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊ खालीलप्रमाणे:-

० पावसाळ्यात नखांची काळजी अशी घ्या
(Monsoon Nail Care Tips)

१) नखांची स्वच्छता – पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता. त्यामुळे आपले पाय आणि नखे नेहमी स्वच्छ राहतील याची काळजी घ्या. बाहेरून आल्यानंतर कोमट पाण्याच्या सहाय्याने पाय धुवा आणि नखे स्वच्छ करा. यामुळे नखांमध्ये साचलेली घाण वा माती निघून जाईल.

२) पाय कोरडे करा – (Monsoon Nail Care Tips) समजा ऑफिसमध्ये जाताना भिजलात आणि पायात चप्पल तशीच ओली ठेवली तर..? तर तुमचे पाय आणि पायांची नखं यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाय ओले राहणार नाहीत याची काळजी घ्या. पायातून ओली चप्पल, शूज काढून पाय कोरडे करा. शक्य झाल्यास पाण्याने पाय स्वच्छ करून कोरडे करा.

३) नारळाच्या तेलाने मसाज करा – नारळाचं तेल त्वचा आणि केसांसह नखांसाठीही फायदेशीर असतं. त्यामुळे पावसाच्या दिवसात नखांचे आरोग्य धोक्यात आहे असे वाटले तर, नारळाच्या तेलाचा वापर करा. यासाठी पाव कप नारळाच्या तेलात, पाव कप मध आणि चार थेंब रोझमेरी ऑइल मिसळा. आता तयार मिश्रण थोडं गरम करून घ्या. यानंतर तेल थोडं कोमट करून त्यात पायांची नखे भिजतील एव्हढे पाय बुडवून बसा. साधारण १५ ते २० मिनिट आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. यामुळे नखांचे आरोग्य राखण्यास मदत होईल.

४) दूध आणि अंड्याचा लेप लावा – पावसाळ्यात नखांचे आरोग्य राखायचे असेल तर दूध आणि अंडं हे दोन्ही पदार्थ फायदेशीर आहेत. एकतर या दोन्ही पदार्थांचे सेवन करा आणि दुसरं म्हणजे याचा लेप पायाला लावा. यासाठी एका अंड्याचा सफेद भाग दुधात मिसळून फेटा आणि यामध्ये ५ मिनिट यात पायाची नखे भिजवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा असे केल्यास नखे मजबूत होतील आणि पावसाळ्यात नखांचे आरोग्य राखणे सोपे जाईल. (Monsoon Nail Care Tips)

Vitamin C

५) व्हिटॅमिन C युक्त पदार्थांचा आहार घ्या – पावसाळ्यात नखांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. ज्यामुळे नखांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. मग विविध औषधोपचार आणि घरगुती उपाय यांच्यासह आहाराकडे लक्ष देणे देखील अत्यंत गरजेचे आहे. म्हणून तज्ञ सांगतात कि, नखांचे आरोग्य राखण्यासाठी विटामिन सी खूपच फायदेशीर असतं. म्हणून आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी आहारात लिंबू वर्गीय फळांचा समावेश करणे फायदेशीर राहील.

Garlic

६) लसूण पेस्टचा वापर करा – (Monsoon Nail Care Tips) लसणीतील बरेच घटक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामूळे आहारात तयार आवर्जून लसणाचा वापर करा. पण पावसाळ्यात जर रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल आणि पायाच्या नखांचे आरोग्य राखायचे असेल तर लसणाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. कारण लसूण केवळ खाण्यासाठीच नाही तर नखांचं पोषण आणि वाढीसाठीदेखील फायदेशीर आहे. म्हणून लसणाची पेस्ट आठवड्यातून २ वेळा पायाच्या नखांवर लावा.

लसूण अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असल्यामुळे नखांना आवश्यक पोषण आणि सुरक्षा यातून मिळते. शिवाय १ चमचा लसूण पेस्ट आणि १ चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगरचे मिश्रणदेखील नखांवर लावूनस्वच्छ केल्यास नखांना संसर्गाचा धोका राहत नाही.

७) कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करा – कडुलिंबाच्या काड्या आणि पाने विविध औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. शिवाय यातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे पावसाळ्यात याचा फायदा होतो. (Monsoon Nail Care Tips) पावसाळ्यात नखांची होणारी हानी आणि संसर्ग यापासून बचावासाठी कडुलिंबाच्या पाण्याने पाय आणि नखे स्वच्छ करा. यामुळे नखांचे आरोग्य राखणे सोपे जाते.

८) लिंबू आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण लावा – लिंबामध्ये व्हिटॅमिन सी’ची मात्रा मोठी असते. तसेच ऑलिव्ह ऑइल नखांची वाढ यासाठी फायदेशीर असते. म्हणून पावसाळ्यात नखांचे आरोग्य राखण्यासाठी १ चमचा लिंबाच्या रसामध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून गरम करून घ्या. यानंतर १० मिनिट नखं यात बुडवून ठेवा. यामुळे एकतर नखांना संसर्गाचा धोका जाणवणार नाही आणि नखे वाढण्यासही मदत होईल.

९) टूथपेस्टचा वापर करा – (Monsoon Nail Care Tips) पावसाळ्यात पायाची नखे तुटण्याची समस्या फार जाणवते. यावर उत्तम उपाय म्हणजे टूथपेस्ट. यासाठी टूथपेस्ट पायाच्या नखांवर घासा आणि पाय स्वच्छ करा. असे केल्याने नखांवरील घाण निघून जाईल. शिवाय नखे स्वच्छ होतील. संसर्गाचा धोका कमी होईल.

Gel Nails

१०) रोज नेलपेंट लावू नका – नियमित नेलपेंटचा वापर केल्यामुळे आधीच नखे कमकुवत होतात. त्यात पावसाचे पाणी आणि माती यामुळे नखांना आणखीच त्रास होतो. शिवाय नेलपेंटमधील कृत्रिम घटक पावसात नखांचे आणखीच नुकसान करतात. ते होऊ नये म्हणून नियमित नेलपेंट लावू नका. (Monsoon Nail Care Tips)

‘हे’ पण वाचा:-

Monsoon Nail Care – भाग 1 : पावसाळ्यात पायांच्या नखांचे आरोग्य धोक्यात आहे हे कसे ओळखालं..?; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

Artificial Nails: रंगबेरंगी कृत्रिम नखे आरोग्याची लावतील वाट; जाणून घ्या दुष्परिणाम

Vegan Diet – भाग 1: ‘व्हेगन डाएट’ म्हणजे काय..?; जाणून घ्या

Vegan Diet Benefits – भाग 2 : व्हेगन डाएटचे प्रकार किती व कोणते..?; जाणून घ्या फायदे

How To Eat Potatoes – बटाटा खाल्ला की वजन वाढत..?; तज्ञ सांगतात खाण्याचा योग्य मार्ग