Mud Therapy Benefits
| |

Mud Therapy Benefits- भाग 2: आयुर्वेदमान्य ‘मड थेरेपी’ देते शारीरिक आणि मानसिक आरोग्य; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Mud Therapy Benefits) ‘मड थेरेपी’ हा नैसर्गिक उपचारांचा अत्यंत महत्वपूर्ण असा भाग आहे. कारण यामध्ये नैसर्गिकरित्या मातीचा वापर केला जातो. यासाठी विशेष प्रकारची माती वापरली जाते. हि माती कालवून त्याचा चिखल तयार केला जातो आणि त्याच्या माध्यमातून मानवी आरोग्याशी संबंधित समस्यांचे समाधान केले जाते. मड थेरेपी विशेष करून ‘मड बाथ’ म्हणून लोकप्रिय आहे. खरतर मातीने उपचार या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. मात्र आयुर्वेदानेदेखील हे मान्य केले आहे कि, मातीच्या सहाय्याने प्रभावीरित्या उपचार केले जाऊ शकतात.

Mud Therapy

‘मड थेरेपी’ करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. कारण माती हा नैसर्गिक घटक असल्यामूळे ती कोणत्याही प्रकारे हानिकारक ठरत नाही. शिवाय मातीमध्ये खनिजे आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. (Mud Therapy Benefits) यामुळे माती सर्वांगीण उपचार करण्यासाठी पोषक मानली जाते. म्हणूनच स्पोर्ट्स मध्ये सक्रिय व्यक्ती चालू ऍक्टिव्हिटीमध्ये जखम झाल्यास त्यावर थेट माती लावून पुढे होतात. याचे कारण स्पष्ट आहे कि, संक्रमण टाळण्यासाठी आणि रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी मातीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. जे अशावेळी फायदेशीर ठरतात.

Mud Therapy

मड थेरेपीमध्ये वापरली जाणारी माती हि विशिष्ट गुणधर्मांनी परिपूर्ण असते. कारण ‘मड थेरेपी’साठी वापरली जाणारी माती हि जमिनीच्या पृष्ठभागापासून ६० सेमी खोल जाऊन काढली जाते. हि माती वापरण्यापूर्वी सूर्याच्या किरणांमध्ये वाळवून अशुद्धता विभक्त करण्यासाठी चाळली जाते. ज्यामुळे हि माती आपले शरीर डिटॉक्स करते. म्हणजेच आतून स्वच्छ करते. यामुळे शरीरातील आंतर बिघाड दुरुस्त करता येतो.

आपण भाग १ मध्ये (Mud Therapy Benefits) ‘मड थेरेपी’ काय असते..? तिचा मानवी जीवनात कसा वापर केला जातो..? ‘मड थेरेपी’साठी वापरली जाणारी माती कोणती असते आणि ती कुठून मिळवली जाते. याबाबत सविस्तर माहिती घेतली. यानंतर आता आज भाग २ मध्ये आपण ‘मड थेरेपी’ आरोग्यासाठी कशी लाभकारी आहे..म्हणजेच त्याचे फायदे काय..? हे जाणून घेणार आहोत.

० ‘मड थेरेपी’चे फायदे (Mud Therapy Benefits)

१) ताप आणि डोकेदुखीपासून आराम – सतत ताप येणे वा डोकेदुखी होणे असे त्रास होत असतील तर आवर्जून ‘मड थेरेपी’चा प्रयोग करा. कारण अशा समस्यांवर मड थेरेपी कमालीची प्रभावी आहे. यासाठी आपल्या ओटीपोटाच्या भागावर ‘मड पॅक’चा प्रयोग करा आणि काही काळ शांत झोपून रहा. यामुळे हि माती शरीरातील उष्णता शोषून शरीराचे तापमान कमी आणि संतुलित करेल. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी हे विशेषतः वापरले जाते. कारण कोणत्याही औषधांपेक्षा हा उपचार प्रभावी मानला जातो.

२) डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभकारी – (Mud Therapy Benefits) आजकाल बरेच लोक मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही अशा डिजिटल स्क्रीनच्या आहारी गेल्याचे दिसून येते. शिवाय संपूर्ण दिवस काम करणारे लोक संगणकाच्या स्क्रीनसमोर बराच वेळ घालवतात. परिणामी डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. तर अशावेळी डोळ्यांचे संरक्षण आणि डोळ्यांचे आरोग्य दोन्ही एकाच वेळी साधायचे असेल तर ‘मड थेरेपी’सारखा उत्तम पर्याय नाही.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदातसुद्धा डोळ्यांवर चिखलाचा थर लावण्याची किंवा चिखलात अंघोळ करण्याची उपचार पद्धती वापरली जाते. काचबिंदू सारख्या डोळ्यांच्या विकारांना प्रतिबंध करण्यासाठीदेखील हि थेरेपी १००% लाभदायी आहे.

Stress

३) ताण तणाव होईल दूर – दररोजची जीवनशैली दगदगीची असेल तर साहजिकच ताण तणावाची समस्या येणारच. पण हि समस्या बालवल्यास मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशावेळी ‘मड थेरेपी’ अत्यंत फायदेशीर ठरते. (Mud Therapy Benefits) कारण माती नैसर्गिक शीतलक असल्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित करून तणावावर मात करण्यास सहाय्य करते. तणाव, चिंताग्रस्त विकार, झोपेच्या समस्या, स्लीपिंग डिसऑर्डर अशा समस्यांवर मड थेरपीने उपचार केले जातात.

Stomach Pain

४) पोटाच्या समस्यांपासून सुटका – बदलते ऋतू आणि बदलते हवामान शरीरावर परिणाम करत असते. ज्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊन आंतरक्रिया बिघडू शकतात. यासाठी ‘मड थेरेपी’चा वापर फायदेशीर भूमिका बजावतो. कारण मातीतील गुणधर्म शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करून शरीरातून विष आणि इतर हानिकारक रसायने बाहेर टाकण्यास मदत करतात. अशा घटकांमुळे झालेले अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी, मुरडा अशा समस्या वाढल्यास पोटावर कालवलेली माती लावा. यामुळे पोटाचे आजार बरे होतात आणि आरामही मिळतो.

Digestion

५) पचनक्रियेला चालना – (Mud Therapy Benefits) काहीबाही खाणे, प्रमाणापेक्षा जास्त खाणे यामुळे पचनक्रिया बिघडते. तसेच पचनक्रिया बिघडल्यामुळे तुम्ही आजारी होऊ शकता. अशावेळी पोटावर मातीचा लेप लावल्याने शरीरातील वाईट विषारी द्रव्ये माती शोषून घेते. तसेच शरीराचे तापमान संतुलित करते आणि पोटाभोवती चिखलाचा थर लावल्याने आपोआपच पचनक्रिया सुधारते. यामुळे शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्सिफाय होते आणि शरीरातील चयापचय गतीही वाढते.

Weight gain

६) वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यास उपयुक्त – वाढते वजन हि समस्या आजकाल एखाद्या संसर्गासारखी वाढत चालली आहे. यावर हजारो वर्षे ‘मड थेरपी’चा वापर केला जात आहे. तो असा कि, मातीने शरीरातील विषारी द्रव्ये शोषून घेतल्यामुळे आपोआपच वजन कमी होऊ लागते. कारण यामुळे शरीरातील चरबी जळायला मदत होते. स्टीम आणि सॉना बाथ शरीराच्या बेसल मेटाबॉलिज्मला गती देण्यासाठी तसेच चरबी जाळण्यासाठी आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करते.

Skin

७) त्वचेसाठी फायदेशीर – (Mud Therapy Benefits) मड थेरेपीला मड बाथ म्हणून ओळखले जाते. याचा वापर जगातील अनेक सेलिब्रिटी जास्त करतात. कारण याचा फायदा सर्वाधिक त्वचेला होतो. यासाठी मुलतानी माती हा अतिशय लोकप्रिय मातीचा प्रकार आहे. या मातीचा चिखल त्वचेवर लावल्यास अनेक चमत्कारिक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार, माती शरीरातून अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी त्वचेचे डिटॉक्सिफिकेशन करते. यामुळे त्वचेसाठी विविध फायदे प्राप्त होतात.

० ‘मड थेरपी’चे इतर फायदे :-

८) ‘मड थेरेपी’मूळे मूड ताजा होतो. संपूर्ण दिवस स्फूर्तिदायक आणि चैतन्यदायी होतो.

९) ‘मड थेरेपी’मूळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीराला नैसर्गिक शीतलता मिळते. ज्यामुळे उष्णतेचे त्रास होत नाहीत. (Mud Therapy Benefits)

Mud Therapy

१०) ‘मड थेरेपी’मूळे शरीरातील विषारी संयुगे आणि रसायने काढून टाकण्यास मदत होते. ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि रक्त परिसंचरण सुधारते.

११) ‘मड थेरेपी’ हि दाहक स्थितीत अत्यंत फायदेशीर भूमिका निभावते. शिवाय शारीरिक वेदना, थकवा दूर करण्यासाठी हि थेरेपी मदत करते.

१२) ‘मड थेरेपी’ विरोधी दाहक आणि विरोधी वृद्धत्व प्रभाव प्रदान करणारी आयुर्वेदमान्य उपचार पद्धती आहे. (Mud Therapy Benefits)

‘हे’ पण वाचा :-

Mud Therapy: भाग 1 :- ‘मड थेरेपी’ म्हणजे काय..?; माहित नसेल तर लगेच जाणून घ्या

मातीच्या माठातील पाणी नैसर्गिकरित्या आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

Ginger Benefits: पावसाळ्यात आल्याचे सेवन देई संसर्गापासून संरक्षण; जाणून घ्या फायदे

Copper Ring Benefits: तांब्याची अंगठी ‘या’ बोटात घालाल, तर अशांत मन होईल शांत; जाणून घ्या फायदे