Mud Therapy

Mud Therapy: भाग 1 :- ‘मड थेरेपी’ म्हणजे काय..?; माहित नसेल तर लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक आजार असे असतात ज्यावर उत्तम प्रतीचे निसर्गोपचार केल्यास मात करता येते. निसर्गोपचार म्हणजेच नॅचरोपॅथी. (Mud Therapy) नॅचरोपॅथी कोणतीही गंभीर समस्या मुळापासून दूर करते. शिवाय यात सर्व नैसर्गिक औषधींचा वापर नैसर्गिकरित्या केला जातो. यामुळे अशा थेरेपीचा आपल्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. यांपैकी एक प्रचलित थेरपी म्हणजे मड थेरपी. ऐकताना थोडं विचित्र वाटत असलं तरीही मड थेरपी हा एक उत्तम आणि प्रभावी निसर्गोपचार आहे हेच खरं.

विविध निसर्गोपचारांपैकी मड थेरेपी अत्यंत प्रभावी आणि वापरात असलेली थेरेपी आहे. या थेरेपीमध्ये चिकणमातीच्या लेपच्या सहाय्याने विविध आरोग्यविषयक समस्या दूर केल्या जातात. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालाच तर मानवी अंगावर चिखल लावून किंवा विशिष्ट मातीच्या पट्ट्या लावून केले जाणार नैसर्गिक उपचार म्हणजेच ‘मड थेरपी’ (Mud Therapy) होय. या मड थेरपीच्या सहाय्याने गंभीर अशा अनेक रोगांवर उपचार केले जाऊ शकतात.

या थेरपीच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांवर मात करता येते. शिवाय त्वचेशी संबंधित ताणतणाव, वेदना, अस्वस्थता अशा समस्यादेखील मुळापासून दूर केल्या जाऊ शकतात. नैसर्गिक उपचार तेव्हाच फलदायी ठरतात जेव्हा त्याचा वापर कधी..? कुठे..? आणि कसा..? करायचा हे माहित असेल. म्हणून आज आपण मड थेरेपीची पूर्ण माहिती घेऊया. (Mud Therapy)

Mud Therapy

1. मड थेरेपी म्हणजे काय..?

मड थेरेपी हा नैसर्गिक उपचारांचा भाग आहे. यामध्ये नैसर्गिकरित्या मातीचा वापर केला जातो. यासाठी विशेष प्रकारची माती वापरली जाते. हि माती कालवून त्याचा चिखल तयार केला जातो आणि त्याच्या माध्यमातून मानवी आरोग्याशी संबंधित समस्यांचे समाधान केले जाते. (Mud Therapy) मड थेरेपी विशेष करून ‘मड बाथ’ म्हणून लोकप्रिय आहे. खरतर मातीने उपचार या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. मात्र आयुर्वेदानेदेखील हे मान्य केले आहे कि, मातीच्या सहाय्याने प्रभावीरित्या उपचार केले जाऊ शकतात.

Mud Therapy

2. मड थेरेपी आणि मानवी आरोग्य (Mud Therapy)

निसर्गाने आपल्या आरोग्याची काळजी घेणारे अनेक पदार्थ तयार करीत असतो. माती हा त्यापैकीच एक पदार्थ आहे. मातीमध्ये खनिजे आणि इतर पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे माती सर्वांगीण उपचार करण्यासाठी पोषक मानली जाते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल कि, ट्रेकिंग किंवा स्पोर्ट्समध्ये सक्रिय असणारी व्यक्ती अचानक होणाऱ्या जखमांवर माती किंवा चिखल लावते. हा याच थेरेपीचा भाग आहे असे म्हणता येईल. (Mud Therapy) मुळात संक्रमण टाळण्यासाठी आणि रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी मातीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ज्याचा फायदा मानवी आरोग्यासाठी होतो.

Mud Therapy

3. ‘मड थेरपी’ कशाप्रकारे काम करते..?

आयुर्वेद सांगते कि, मानवी शरीर हे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नि आणि आकाश या पंच तत्त्वांनी बनलेले आहे. माती हा पदार्थ देखील या पंच तत्त्वांचा उप भाग आहे. यामुळे शरीराला झालेली हानी बरी करण्यासाठी माती मदत करते. (Mud Therapy) पृथ्वीचा भाग असलेली माती मानवी शरीराला आतून बरे करण्याची आणि शरीरातील बिघाड तसेच कोणतेही असंतुलन सुधारण्याची क्षमता ठेवते. मातीमध्ये अशी अनेक खनिजे असतात जी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे मड थेरेपी अत्यंत फायदेशीर आहे.

मड थेरेपी केल्यामुळे शरीरातील कोणतेही असंतुलन स्थिर होते. कारण मड थेरपीमध्ये वापरली जाणारी माती हि विशिष्ट गुणधर्मांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे हि माती आपले शरीर डिटॉक्स करते. म्हणजेच आतून स्वच्छ करते. यामुळे शरीरातील आंतर बिघाड दुरुस्त करता येतो. (Mud Therapy)

Mud Therapy

4. ‘मड थेरेपी’साठी कोणत्या प्रकारची माती वापरतात..?

मित्रांनो, मड थेरपीसाठी एक विशिष्ट प्रकारची माती वापरली जाते. आपण रस्त्यावर पाहतो किंवा हाताळतो त्या मातीचा आणि थेरेपीचा काहीही संबंध नाही. मड थेरेपीसाठी वापरली जाणारी माती हि जमिनीपासून सुमारे ४ ते ५ फूट खालून काढली जाते. (Mud Therapy) या मातीत अ‍ॅक्टिनोमायसीटीस नावाचा जीवाणू आढळतो, जो आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हा जीवाणू ऋतूनुसार त्याचे स्वरूप बदलतो आणि जेव्हा तो पाणी (water) आणि मातीमध्ये (soil) मिसळतो तेव्हा त्यातून एकप्रकारचा वास येतो, ज्याचा आपल्याला मानसिक फायदा देखील होतो.

तर मित्रांनो, आज भाग १ मध्ये आपण ‘मड थेरेपी’ काय असते..? तिचा मानवी जीवनात कसा वापर केला जातो..? ‘मड थेरेपी’साठी वापरली जाणारी माती कोणती असते आणि ती कुठून मिळवली जाते. याबाबत आपण जाणून घेतले. यानंतर आता पुढील भागात अर्थात भाग २ मध्ये आपण ‘मड थेरेपी’ आरोग्यासाठी कशी लाभकारी आहे..? त्याचे फायदे काय..? हे जाणून घेणार आहोत. (Mud Therapy)

‘हे’ पण वाचा :-

डिजिटल स्क्रीन करते मुलांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ?

मानसिकरित्या सुदृढ राहण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन; जाणून घ्या

Monsoon Nail Care Tips – भाग 2 : पावसाळ्यात पायांच्या नखांची काळजी कशी घ्याल..?; जाणून घ्या

Vegan Diet – भाग 1: ‘व्हेगन डाएट’ म्हणजे काय..?; जाणून घ्या

Post Workout Breakfast – व्यायामानंतर खच्चून भूक लागली तर ‘हे’ पदार्थ खा म्हणजे वेटलॉस होईल पटापट; जाणून घ्या

Moth Bean Benefits – पोषणदायी मठाची डाळ निरोगी जगण्याचा स्वस्त पर्याय; जाणुन घ्या फायदे