Vitamin E Side Effects
|

Vitamin E Side Effects: ‘व्हिटॅमिन ई’ कॅप्सूलचा अतिवापर त्वचेसाठी घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Vitamin E Side Effects धूळ, माती, प्रदूषण आणि इतर अनेक समस्यांमुळे आरोग्याची आणि त्वचेची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. दरम्यान विविध उपाय योजनांवर भर दिला जातो. आजकाल, डिजिटल पिढी थेट सोशल मीडियाचा वा गुगलचा वापर करून विविध उपाय घरबसल्या आपल्या मोबाईलवर शोधून काढते. यामध्ये कितीतरी उपाय घरगुती तर कित्येक उपाय केमिकलविरहित असल्याचे देखील निदर्शनास येते. त्यामुळे डॉक्टर आणि क्लिनिक या पर्यायांपेक्षा लोकांना आता घरच्या घरी गुगल बाबा प्रिय वाटू लागला आहे. पण गुगल वर दिलेल्या माहितीचे तंतोतंत पालन न केल्यास होणाऱ्या परिणामांचं काय..?

आता बघा ना.. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या त्वचेसह, केसांची आणि अगदी आरोग्याचीही उत्तमरीत्या काळजी घेण्यास सक्षम आहे. पण त्याचा वापर कसा करायचा..? हे जर का माहीतच नसेल तर..? तर आरोग्यासोबत खेळण्याचा प्रकारचं घडेल ना. आता असे अनेक उपाय आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करून फायदे मिळवता येतात.

अगदी केसांपासून ते त्वचेवरील सुरकुत्यांपर्यंत सर्व समस्यांवर हा उपाय सर्वोत्तम मानला जातो. यासाठी दररोज रात्री चेहऱ्यावर कोणत्याही जेल किंवा फेस क्रीमचा वापर करण्यापेक्षा व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे सुरकुत्या लगेच निघून जातात. पण जर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केला गेला तर मग कठीण आहे. Vitamin E Side Effects

कारण व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर त्वचेवर केल्यास यातील घटक आपल्या त्वचेतील रक्तप्रवाह सुरळीत करतात आणि कोलेजनचे उत्पादन वाढवतात. यामुळे त्वचेच्या आतील खराब झालेले ऊतक बरे होतात आणि आपली त्वचा तेजस्वी दिसते. पण दीर्घकाळ याचा वापर केल्यास काही समस्या उद्भवतात. जसे कि त्वचा निस्तेज होणे. आकसल्यासारखा दिसणे. Vitamin E Side Effects म्हणूनच व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर योग्य प्रमाणात करणे बंधनकारक आहे. आज आपण व्हिटॅमिन ई कॅप्सुलच्या अति वापराने होणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

० ‘व्हिटॅमिन ई कॅप्सूल’ नक्की काय आहे आणि ती का वापरतात..?

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अल्फा- टोकोफेरॉल नामक एक घटक समाविष्ट असतो. हा घटक एक शक्तिशाली अँटि ऑक्सिडेंट म्हणून ओळखला जातो. याच्या वापराने त्वचेला धूळ, घाण आणि प्रदूषणाच्या प्रभावापासून संरक्षण मिळते. अँटी ऑक्सीडेंट असल्याने हे घटक सुरकुत्या कमी करतात आणि चेहऱ्यावर चमक आणतात. म्हणूनच बहुतेक सौंदर्य तज्ञ त्यांच्या सौंदर्य आहारामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. Vitamin E Side Effects

या व्हिटॅमिन ई’च्या कॅप्सूलमध्ये तेल स्वरूपात असणारा घटक हा त्वचा आणि केसांसाठी लाभदायी मानला जातो. यामुळे ही कॅप्सूल फोडल्यानंतर त्यातील द्रव काही फेस क्रीममध्ये मिसळून चेहऱ्यावर लावले जातात. इतकेच नाही तर तोंडी देण्याचे औषध वा इंजेक्शन म्हणून देखील याचा वापर केला जातो. व्हिटॅमिन ई कोणत्याही स्वरूपात घेतले तरी ते सर्व प्रकारे फायदेशीर आहे. पण त्याचा अतिवापर केल्यामुळे काही काही समस्या निर्माण होतात. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा अतिवापर केल्यास होणारे परिणाम (Vitamin E Side Effects)

१) ऍलर्जी होऊ शकते –

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अनेक असे तत्त्व समाविष्ट असतात जे चेहऱ्यावर काही प्रमाणात वापरल्यास फायदे होतात. पण यांचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे त्वचेवर याचा वापर करण्याआधी किमान एकदा याचा किती वापर करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे. अनेकदा याचा अति वापर केल्यास त्वचेवर पुरळ येते, खाज सुटू लागते, चेहऱ्यावरील त्वचा सुटू लागते आणि केस खराब होऊ शकतात. ही सर्व एलर्जीची लक्षणे आहेत.

Skin Allergy

अशा समस्या असल्यास, कॅप्सूलचा वापर ताबडतोब थांबवा आणि लक्षात घ्या की हि कॅप्सूल कितीही फायदेशीर असली तरी त्वचेवर याचा अतिवापर केल्यास हानी होऊच शकते. जर तुम्हाला याची ऍलर्जी असेल आणि तरीही तुम्हाला व्हिटॅमिन ई कॅप्सूल (Vitamin E Side Effects) वापरायचीच असेल तर तुमच्या नेहमीच्या क्रीममध्ये १ कॅप्सूल मिसळा आणि सतत २ ते ३ दिवस लावा, तरच चांगले परिणाम मिळतात. ते लावल्यानंतर मसाज करायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे याहून अधिक दिवस आणि याहून अधिक मात्रा नसेल याची काळजी घ्या.

२) रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात –

व्हिटॅमिन ई कॅप्सूल असा औषधाचा प्रकार आहे ज्याचा वापर एकतर थेट लिक्विड फॉर्ममध्ये करता येतो किंवा मग तोंडी देण्याचे औषध वा इंजेक्शन स्वरूपात याचा डोस दिला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल तोंडी औषधाप्रमाणे घेण्याचे प्रमाण अधिक असेल तर रक्तातील प्लेटलेट्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते, असे तज्ञांच्या संशोधनातून करण्यात आलेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. Vitamin E Side Effects

Blood

हे औषध आपल्या शरीरातील रक्त पातळ देखील करू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर तोंडी घेण्याचा औषधाप्रमाणे न करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

३) त्वचेचे ब्रेकआउट होतात –

व्हिटॅमिन ई कॅप्सुल तेलात विरघळणाऱ्या पदार्थांसारखी असते. यामुळे व्हिटॅमिन ई हे तेलाच्या स्वरूपात ते त्वचेच्या छिद्रांमध्ये खोलवर मुरते. यामुळे, तेलकट किंवा मुरुम प्रवण त्वचा असेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा अति वापर केला तर त्वचेवर ब्रेकआउटची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Skin Breakout

Vitamin E Side Effects त्यामुळे व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा अति वापर त्वचेला त्रासदायी ठरू शकतो. म्हणून तेलकट त्वचा असे तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरताना व्हिटॅमिन सी असलेले सौंदर्य प्रसाधन वापरावे. यामुळं त्वचेचे नुकसान होणार नाही.

४) पिंपल्स येण्याची समस्या वाढू शकते –

व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेलजाण्या घटक हे अति वापरलायस त्वचेवर उलट कार्य करू शकतात. यामुळे तेलकट त्वचा असलेल्या मुली किंवा महिलांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरणे टाळावे. याचे कारण म्हणजे तेलकट त्वचेच्या तेल ग्रंथी अतिशय सक्रिय असतात.

Acne

यामुळे व्हिटॅमिन ई’च्या कॅप्सूलमध्ये असलेले तेल त्वचेमध्ये तेलाचे प्रमाण वाढवते. परिणामी त्वचेची छिद्रे बंद होतात आणि यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. Vitamin E Side Effects

‘हे’ पण वाचा :-

Argan Oil करते UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण; जाणून घ्या 8 प्रमुख फायदे

Tomato Benefits For Skin लाल लाल टोमॅटो देतो नैसर्गिक सौंदर्य; कसे..? ते जाणून घ्या

पिरीएड्स मध्ये पिंपल्सपासून बचावासाठी आहारात करा ‘हे’ बदल; जाणून घ्या

OMG पिंपल्सने लावली सुंदर चेहऱ्याची वाट; करा ‘हे’ उपाय

आंघोळीच्या पाण्यात ‘या’ गोष्टी मिसळालं तर आरसाही तुमच्या प्रेमात पडेल; जाणून घ्या