Vegan Diet – भाग 1: ‘व्हेगन डाएट’ म्हणजे काय..?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन| (Vegan Diet) हेल्दी जगायचं आहे आणि फिट रहायचं आहे तर डाएट करायलाच हवं. कारण आपण जे काही खातो त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. खाण्याला जर मर्यादा असेल तर आवश्यकतेप्रमाणे आपण आहारातून ऊर्जा ग्रहण करू शकतो. पण आपल काही अस नसतच मुळी… आवडता पदार्थ असला की मार ताव. अगदी ताट चकाचक होईपर्यंत आपण जेवतो. याचा परिणाम म्हणजे ऍसिडिटी, छातीत जळजळ, व्यायामाचा अभाव असेल तर वजनात वाढ. मग जिभेचे चोचले असे अंगलट येतात. म्हणूनच रोजच्या जीवनशैलीत योग्य आहार – विहार आवश्यक आहे असे तज्ञ सांगतात.
तुम्हाला तर माहीतच आहे की, आपले लाडके सेलिब्रिटी कलाकार फिट दिसण्यासाठी नियमित स्वरूपात व्यायाम, योगा करतात. शिवाय त्यांचं निश्चित असं डाएट रूटीन असत. ज्याशिवाय त्यांचा दिवसच पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या आपल्या शरीर रचनेप्रमाणे डाएट (Vegan Diet) करत असतो. वजन कमी करण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी या इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे डाएट फॉलो केले जातात.
यातील प्रत्येक डाएट फॉलो करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. जसे की, कीटो डाएट, जीएम किंवा जनरल मोटर डाएट, उकडलेले खाणे+ साखर आणि मीठाशिवाय असलेला डाएट, पेलियो डाएट, लो कार्ब डाएट, कार्ब साइकिलिंग, डुकन डाएट, अल्ट्रा लो फॅट डाएट, एटकिन्स डाएट, एचसीजी डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग, व्हेगन डाएट. (Vegan Diet)
दरम्यान व्हेगन डाएट जगभरातील सेलिब्रिटींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हे डाएट वजन कमी करतच शिवाय मानसिकरित्या सक्षम होण्यासाठी मदत करत. तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी व्हेगन डाएट हा एक उत्तम पर्याय आहे, असे आहार तज्ञ सांगतात. आता व्हेगन डाएट म्हणजे काय..? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.. तर मित्रांनो आज आपण भाग १ मध्ये याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ. सोबतच हे डाएट कसं करतात.. ? तेदेखील जाणून घेऊ. यानंतर भाग २ मध्ये आपण व्हेगन डाएटचे प्रकार आणि त्याचे फायदे जाणून घेऊ.
० व्हेगन डाएट म्हणजे काय…?
(Vegan Diet)
मित्रांनो, व्हेगन डाएट म्हणजे पूर्णतः शाकाहारी असणे. अर्थात नियमित जीवनशैलीत केवळ शाकाहारी पदार्थांचे सेवन करणे. मुळातच शाकाहारी असणाऱ्या लोकांसाठी हा डाएटचा प्रकार अतिशय फायदेशीर आहे. पण जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी असं डाएट म्हणजे अडचणीचा भाग.
कारण या डाएटमध्ये मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या उत्पादनांचा समावेश होत नाही. तर या डाएटचा पूर्ण भाग हा शुद्ध शाकाहारी वनस्पती आधारित उत्पादनांवर आधारित असतो. त्यामुळे सहसा आहार तज्ञ देखील शाकाहारी लोकांनाच व्हेगन डाएट करण्याचा मार्ग सुचवितात.
० व्हेगन डाएट आरोग्यासाठी फायदेशीर कसे..?
व्हेगन डाएट अर्थात शाकाहारी आहारात हिरव्या भाज्यांसह, स्प्राउट्स, विविध फळे आणि ड्राय फ्रूटचा समावेश असतो. मांसाहारी आहारापेक्षा शाकाहारी आहार हा उत्तम आरोग्य देणारा सिद्ध झाला आहे. आहार तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, मांसाहारी आहारामध्ये प्रोटीनची मात्रा निश्चितच जास्त असते पण फायबरचे काय..? (Vegan Diet)
मांसाहारात फायबरचे प्रमाण अतिशय कमी असते. यामुळे आपण खाल्लेल्या पदार्थांपैकी जे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत तेच पदार्थ शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. याउलट दुसरीकडे, शाकाहारी आहारात भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. शिवाय पचनक्रिया सुधारते आणि शरिरातील निरुपयोगी टाकाऊ पदार्थ मलवाटे उत्सर्जित होतात. त्यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही. परिणामी वजन वाढत नाही आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.
० व्हेगन डाएट कसे केले जाते.. ?
व्हेगन डाएट अतिशय सामान्य डाएटचा प्रकार आहे. जितका समजायला हा प्रकार सोप्पा आहे तितकाच अमलात आणायला सुद्धा हा प्रकार अतिशय सोप्पा आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या दैनंदिन आयुष्यात याचा समावेश करू शकता. (Vegan Diet)
1. व्हेगन डाएट अगदी सामान्य डाएटचा प्रकार असल्यामुळे सामान्य डाएट सारखंच केलं जातं.
2. या डाएटमुळे शरीराला मिनरल, व्हिटॅमिन आणि न्युट्रीयंट्स मिळतात. योग्य पद्धतीने हे डाएट फॉलो केल्याने शरीराला आवश्यक ती सर्व पोषणमुल्य मिळतात.
3. हे डाएट फॉलो करताना कोणत्या वेळी काय खायचे…? हे आधीच ठरवलेले असते. यामुळे ठरलेल्या प्लॅननुसार तुम्ही पदार्थ आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा. (Vegan Diet)
4. व्हेगन डाएट करताना अन्य कोणत्याही जादा पदार्थांचा समावेश रोजच्या डाएट प्लॅनिंग मध्ये करू नका.
अशाप्रकारे व्हेगन डाएट केल्यास कमी दिवसात जास्त वजन कमी करण्यात यशस्वी होता येईल.
आज आपण भाग १ मध्ये व्हेगन डाएट म्हणजे काय..? त्याचा शरीराला कसा उपयोग होतो..? आणि मुख्य म्हणजे हे डाएट कसं करतात ते जाणून घेतलं. यानंतर आपण भाग २ मध्ये व्हेगन डाएटचे प्रकार किती आणि कोणते..? यासह व्हेगन डाएटचे मानवी आरोग्याला फायदे काय..? हे जाणून घेऊ. (Vegan Diet)
‘हे’ पण वाचा:-
7 Day Healthy Meal Plan: हेल्दी रहायचंय..? तर हेल्दी डाएट करा ना; जाणून घ्या आठवड्याचा मिल प्लॅन
बिनधास्त खा !!! मटण,चिकन,मासे किंवा अंडी; प्रत्येकाचे ‘हे’ आहेत फायदे
Vitamin E Side Effects: ‘व्हिटॅमिन ई’ कॅप्सूलचा अतिवापर त्वचेसाठी घातक; जाणून घ्या
Immunity System – भाग 1: पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत का होते..?; जाणून घ्या कारणे
Moth Bean Benefits – पोषणदायी मठाची डाळ निरोगी जगण्याचा स्वस्त पर्याय; जाणुन घ्या फायदे
Vegetarian Protein Sources : प्रथिनांची कमतरता भरून काढतील ‘हे’ 10 व्हेज पदार्थ; जाणून घ्या