International Yoga Day
| |

International Yoga Day : योग दिनाचे मानवी जीवनशैलीतील महत्व; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| (International Yoga Day) निरोगी आरोग्यासाठी काही चांगल्या आणि उत्तम सवयी असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा सवयींपैकी एक सवय म्हणजे योगाभ्यास करणे. नियमित न चुकता योगा करणाऱ्या व्यक्ती नेहमी आशावादी असतात. सुदृढ आणि लवचिक शरीर, उत्तम रोग प्रतिकार क्षमता, तेजस्वी चेहरा, त्वचेवरील चमक आणि मुळात शरीराची ठेवण व्यवस्थित असण्यामागे योगा आहे.

तुम्ही जाणत असाल की, बॉलिवूड असो, हॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा मग मराठी सिनेसृष्टी या कोणत्याही इंडस्ट्रीतील कोणताही कलाकार आपल्या शरीराच्या आकर्षक ठेवणीसाठी नेहमीच फिटनेस टीप्सचा वापर करत असतो. आता बघा ना मलायका अरोरा किंवा मग शिल्पा शेट्टी या अभिनेत्री चाळिशी उलटूनही किती टवटवीत आणि लक्षवेधी दिसतात. त्यांच्या आकर्षक शरीरयष्टी आणि तेजस्वी चेहऱ्याचे रहस्य देखील योगा आहे.

(International Yoga Day) दिवसाची सुरुवात जर योगाभ्यास केल्याने होत असेल तर अख्खा दिवसही उत्साही जातो. आजकाल फिटनेस फंडा म्हणून योगाकडे पाहिलं जात. पण फिटनेस फंडा योगा नेमका काय प्रकार आहे त्याचे दैनंदिन जीवनात काय महत्व आहे हे प्रत्येकाला ठाऊक असायला हवे. म्हणूनच आज २१ जून जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. आजचा दिवस लोकांना योगाचे महत्व समजावे यासाठी साजरा केला जातो. जाणून योगाबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे:-

० योग शब्दाची उत्पत्ती

योग हा शब्द मुळात संस्कृत आहे. संस्कृत युज् या धातुपासून या शब्दाची उत्पत्ती अर्थात निर्मिती होऊन तो तयार झाला आहे. पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे एक महत्वपूर्ण सूत्र आहे. योग या शब्दाचा मुळातच अर्थ ‘जोडणे, एकत्र आणणे, जुळवणे’ असा अनेक प्रकारे होतो. (International Yoga Day) संस्कृतच्या युज आणि योक या दोन शब्दांचे मिलन झाल्यामुळे योग हा शब्द तयार झाला आहे.यातील युजचा वास्तविक मूळ अर्थ जोडणे, बांधणे असा होतो. तर योकचा वास्तविक अर्थ एकाग्र चित्त, मनाची एकाग्रता, विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असा होतो.

० योग म्हणजे काय..? (International Yoga Day)

सामान्य आणि सहज सोप्या समजण्याजोग्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा योग्य समन्वय होय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण- तणाव कमी करण्यात प्रभावी आहे. इतकेच काय तर आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण योगाच्या सहाय्याने होते.

(International Yoga Day) शिवाय योग ही आध्यात्मिक वाट असून या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. अर्थातच, हे ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवरचे नियम पाळावेच लागतील. योगा करण्याच्या विविध पद्धती आणि विविध प्रकार आहेत. त्यानुसार योगा करण्याचे विविध नियम आहेत जे पाळणे बंधनकारक आहे.

० योगाचे प्रमुख नियम

योगाचे प्रमुख असे ३ नियम आहेत. ज्यांचे पालन सामान्य जीवनशैली साठी बंधनकारक आहे यामुळे जीवनात एक वेगळाच आनंद आणि उत्साहाची अनुभूती होते.

नियम १ – सात्त्विक जीवनशैली

नियम २ – संस्कारक्षम नियंत्रित मन

नियम ३ – सात्त्विक विचार

या तिन्ही नियमांचा आपल्या दैनंदिन जीवनावर एकत्रित परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीला हे नियम सामान परिणाम देत असतात. (International Yoga Day) जो मनुष्य या तीनही नियमांचा विचारपूर्वक उपयोग करतो तो स्वत:च्या मनावर पूर्णत: ताबा मिळवण्यात यशस्वी होतो. एकदा का त्याचे मन शांत आणि नियंत्रित झाले की आपोआपच शरीरसुध्दा पूर्णत: त्या व्यक्तीच्या ताब्यात येते.

० योगाचे मूळ

प्राचीन माहितीनुसार, योगाचे मूळ दोन गोष्टींमध्ये सामावलेले असते. एक म्हणजे शारीरिक आणि दुसरे म्हणजे आध्यात्मिक. यांपैकी शारीरिक मुळात आसन, क्रिया आणि प्राणायाम यांचा समावेश असतो. या सर्वांचा योग्यरीतीने अभ्यास केल्यामुळे शरीरास योग्य आध्यात्मिक यश प्राप्त होते. यांपैकी दुसरे मूळ आध्यात्म याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः सिद्ध योग गुरू.

Yoga

० योगाचे प्रकार

प्राचीन भारतीय योग शास्त्रानुसार योगाचे ५ प्रकार आहेत.

प्रकार १ ज्ञान योग – आत्मज्ञान

प्रकार २ हठ योग – आसन आणि कुंडलिनी जागृति

प्रकार ३ कर्म योग – योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)

प्रकार ४ भक्ति योग – भजनं कुर्याम्-भजन करावे

प्रकार ५ राजयोग – योगः चित्तवृत्तिनिरोधः (चित्तातील वृत्तींवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)

० योगाची अंगे

योगाचा अर्थ चित्तातील वृत्तींचा निरोध. या विचारानुसार योगाची ८ अंगे आहेत

१) यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग

२) नियम (स्वाध्याय, संतोष, तप, पवित्रता, आणि ईश्वराप्रती चिंतन) बाहेरचे अंग

३) योगासन बाहेरचे अंग

४) प्राणायाम बाहेरचे अंग

५) प्रत्याहार बाहेरचे अंग

६) धारणा आतले/मानसिक अंग

७) ध्यान आतले/मानसिक अंग

८) समाधी आतले/मानसिक अंग (International Yoga Day)

० योगाचे मानवी जीवनास फायदे

१. योग देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो.

२. योग ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून मानसिक पूर्णता देते.

३. योग स्वतःत एक पूर्ण विज्ञान आहे. एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे, एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे जी मानवी जीवनात स्थैर्य आणते.(International Yoga Day)

Yoga

४. योगा करणाऱ्यास कोणत्याही जाती धर्माचे बंध नसते म्हणून योगा सर्व धर्म समभाव ही जागृती करू शकतो.

५. योग व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्ये शिवाय समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही उपयोगी आहे .

६. योग माणसाला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर घेऊन जातो. ही एक अद्भुत विद्या आहे जी शुद्ध मनाने आत्मसाद केल्यास परम सुख प्राप्त होते.

७. योग एक पूर्ण अभ्यास आहे ज्याच्या माध्यमातून माणूस आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवू शकतो. यामुळे जगण्याची जिद्द आणि आध्यात्मिक सुखाचा परमानंद अनुभवता येतो. (International Yoga Day)

‘हे’ पण वाचा :-

Muscle Pain : स्नायूंच्या दुखण्याने केले हाल..?; हि 5 योगासने देतील आराम

10 Psychological Tips For Fitness: व्यायाम करायचाय पण कंटाळा खूप येतो..? मानसशास्त्रात सांगितलेत उपाय; लगेच जाणून घ्या

मान दुखी, खांदे दुखी, पाठ दुखीने आहात त्रस्त; ‘या’ सोप्या योगासनांद्वारे होईल रामबाण इलाज

डायबिटीज मध्ये ‘या’ आसनांचा करा वापर