Muscle Pain
|

Muscle Pain : स्नायूंच्या दुखण्याने केले हाल..?; हि 5 योगासने देतील आराम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Muscle Pain एकाच ठिकाणी तासनतास बसून राहिल्याने काम किती होतं ते माहित नाही पण स्नायू दुखावतात इतकं नक्की. तुम्हालाही याचा कधीतरी अनुभव आलाच असेल ना.. जसे कि, ऑफिसमधून घरी गेल्यानंतर हात पाय भरून येणे, मान दुखणे, पाठ दुखणे आणि संपूर्ण शरीरात थकवा जाणवणे. कधी कधी तर हात पाय हलवणेही मुश्किल होऊन जाते. त्यात मान अवघडली तर सरळ एकाच दिशेकडे पाहण्याची सक्ती होते. कारण ना उजवीकडे ना डावीकडे अशी परिस्थिती मानेची होऊन जाते.

अशावेळी पेन किलर किंवा विविध मलम आणि गोळ्या औषधे खाऊन दुखणाऱ्या स्नायूंवर इलाज केला जातो. पण प्रत्यक्षात मान का दुखावली याचे कारण कुणीच शोधून काढत नाही.. अनेकदा खूप वजनाचे सामान उचलणे, तासनतास एकाच स्थितीत बसून राहणे, बराच वेळ टीव्ही पाहणे, चुकीच्या स्थितीत झोपणे अशा काही कारणांमुळे मान आणि पाठीचे स्नायू दुखावतात. (Muscle Pain)

बघा ना.. स्मार्टफोन पाहताना, पुस्तक वाचताना आपली मान सरळ खाली जाते. पण कॉम्प्युटरवर काम करताना स्क्रीनवर नजर स्थिर ठेवावी लागते आणि त्यामुळे आपली मान खाली न जाता हनुवटीच्या दिशेने पुढे येते. यामुळे मानेचा एक विशिष्ट कोन तयार होतो आणि त्या स्थितीमध्ये आपण कमीत कमी ४ ते ६ तास काम करत असतो. परिणामी ‘पॅरा स्पायनल मसल्स’, जे ‘डीप मसल्स’ आहेत, ते अवघडलेल्या स्थितीमध्ये तासनतास राहिल्यामुळे मानेचे स्नायू आखडतात.

परिणामी मान अवघडणे, मान दुखणे, खांद्यावर, पाठीवर सूज येणे, हात दुखणे, हाताला मुंग्या येणे अशा तक्रारी सुरू होतात. आजकाल तरुणांमध्ये ‘स्ट्रेटनिंग ऑफ सर्व्हायकल स्पाइन’ हा विकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्याचं एक कारण म्हणजे मानेचा एकाच स्थितीमध्ये होणारा अतिवापर.

अन्यही अनेक कारणांनी मानदुखी होऊ शकते. जसे कि, भरपूर काम करणे, संगणकापुढे बसताना आपली उंची आणि संगणकाचा स्क्रीन यांच्यात ताळमेळ नसणे किंवा मान उंच करून स्क्रिनवरचा मजकूर सतत वाचणे यामुळेही मानदुखी सुरू होते. परिणामी डॉक्टरांकडे जाण्यावाचून पर्याय उरत नाही. (Muscle Pain) याशिवाय हातापायात गोळा येण्याची समस्या असेल किंवा पाठीचा कणा भरणे. अशा समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे स्नायूंवर ताण येणे. आता स्नायूंवर ताण आला तर दुखणे खुपणे चालू राहणारच. म्हणून स्नायूंची काळजी घ्या. पण कशी..? तर तेच आज आपण जाणून घेऊ.

स्नायूंची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तरुण पणात केलेला बाहुबलीपणा उतार वयात त्रासदायी ठरू शकतो. यासाठी सगळ्यात आधी काही सोप्प्या टिप्स आहेत त्या आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर काही योगासनं जाणून घेऊ. जी योगासने तुमच्या स्नायूंना आराम देतात आणि दुखणे, खुपणे तसेच त्यांच्यावरील ताण दूर करून आराम देतात. चला तर लगेच जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

(Muscle Pain) स्नायूंचे दुखणे हि अतिशय सामान्य बाब आहे. आपल्या हालचालींविषयी निष्काळजीपणा करणे हे याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे काही सोप्प्या टिप्सचा नियमित जीवनशैलीत वापर करा.

टीप 1 – सतत आणि तासनतास कॉम्प्युटरवर काम करताना दर अर्ध्या- एक तासानंतर आहे त्याच जागेवर मानेचे हलके व्यायाम करावेत. मानेची हालचाल करत राहिल्याने मान अखडणे आणि दुखणे या समस्या जाणवत नाहीत.

टीप 2 – खूप घाई आणि गडबड करीत भरभर चालताना वेडी वाकडी पाऊले टाकली जातात. यामुळे पायाच्या स्नायूंवर जोर येतो आणि यामुळे पायाचे दुखणे सुरु होते. तर यासाठी सगळ्यात आधी व्यवस्थित चप्पल वा शूज वापरा आणि चालताना भरभर जरी चालायचे असेल तरीही पायाखाली येणाऱ्या वस्तूंकडे लक्ष द्या. शक्यतो फार घाईत चालू नका. (Muscle Pain)

टीप 3 – बसल्या जागी काम करणाऱ्यांना पाठीचे दुखणे होण्याची दाट शक्यता असते. म्हणून अशावेळी एकाच ठिकाणी सतत बसून राहणे टाळा. शिवाय वाकून चालणेही टाळा. यामुळे पाठीत बाक येणार नाही. तसेच ताठ बसा आणि चालतानाही ताठ चालण्याचा प्रयत्न करा. यामुळे पाठीचा कणा सरळ आणि वेदना रहित राहू शकतो.

टीप 4 – नियमितपणे योगाभ्यास करा. मान, पाठ, खांदे आणि हातापायांना त्याची सवय करून घ्या. यामुळे स्नायूंचा नियमित व्यायाम होईल. परिणामी स्नायूंचे दुखणे दूर होईल. शिवाय स्नायूंवर भार आणि ताणही राहणार नाही.

० स्नायूंच्या दुखण्यावर 5 प्रभावी योगासने
(Muscle Pain)

१. नटराजासन –

जमिनीवर पाठीवरती झोपावे. हळूहळू तुमचा उजवा पाय उचला आणि डाव्या पायावरून आणा. डावा पाय सरळच ठेवावा आणि उजवा पाय जमिनीशी काटकोनात आहे याची खात्री करावी. दोन्ही हात दोन्ही दिशेने फैलावे आणि तोंड उजव्या दिशेने वळवावे. या स्थितीत तीस सेकंदे रहावे आणि काही दीर्घ श्वास घ्यावेत. हे पायाने पुन्हा करावे.

२. उत्थित त्रिकोणासन

सरळ ताठ उभे राहावे. आता दोन पायांना एकमेकांपासून जितके लांब नेता येईल. तितके लांब न्यावे. सरळ ताठ उभे राहून दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावे. श्वास आत घ्या आणि हळूहळू उजव्या बाजूला वाका, तुमचा उजवा हात पायाच्या उजव्या घोट्याला स्पर्श झाला पाहिजे आणि डावा हात वरच्या दिशेला असावा.

(Muscle Pain) या स्थितीत असताना तुमच्या डाव्या हातावर दृष्टी ठेवा. या स्थितीत जितका वेळ राहता येईल तितका वेळ रहा. पण लक्षात ठेवा की तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन शरीराला ताणू नका. योगाचा उद्देश्य आहे तुमच्या वेदनेपासून तुम्हाला सुटकारा देणे, वेदना वाढविणे नाही.

३. बालासन –

(Muscle Pain) जमिनीवर गुडघ्यांवर उभे रहा / गुडघ्यांचा खालचा भाग जमिनीला टेकलेला असावा आणि पायाचे अंगठे एकमेकांना चिकटलेले असावेत. पायांच्या टाचांवर बसावे. हात शरीराच्या बाजूला असावे, श्वास सोडवा आणि तुमच्या शरीराचा कमरेपासून वरचा भाग तुमच्या मांड्यांवर आणा. हळूहळू डोके जमिनीवर टेकवावे. जेवढे शक्य आहे तेवढेच करावे. शरीराला जास्त ताण देऊ नये.

तुमचे हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि हाताचे तळावे आकाशाच्या दिशेला असावेत. या स्थितीत जितका वेळ राहता येईल तितका वेळ राहावे आणि हळूहळू श्वास घेत स्वतःला आधीच्या अवस्थेत उचलून घ्यावे. हातांना मांड्यांवर ठेवावे, तळावे छताच्या दिशेने देवाला शरण जाण्याच्या स्थितीत असावेत.

या आसनामुळे मानदुखी व पाठदुखी यापासून आराम तर मिळतोच शिवाय हे आसन तुमच्या मेंदूलासुद्धा शांत करते. हे नितंब, मांड्या आणि घोट्यांना ताणवते आणि तुम्हाला एक बालक झाल्यासारखे वाटते!

४. मार्जरासन –

अनुक्रमे, श्वास सोडा आणि तुमच्या पाठीचा कणा छताच्या दिशेने गोलाकार करा आणि तुमचे डोके आतील दिशेने वळवा. तुमची हनुवटी हळुवारपणे छातीवर टेकवा. (Muscle Pain) ही दोन आसने (गाईप्रमाणे आसन आणि मार्जरासन) श्वास घेताना आणि सोडताना क्रमाक्रमाने करीत राहा. असे केल्याने तुमच्या पाठीचा कणा आणि तुमच्या पोटातील इंद्रिये यांना हळुवार मालिश केल्या जातात आणि सोबत मानदुखीपासूनसुद्धा सुटकारा!

५. शवासन –

हे तर सर्वात सोपे आहे. हे करावयाची सूचना ही आहे की तुम्ही काहीही करू नका! शरीर तटस्थ ठेवण्याची या आसनात आवश्यकता आहे. जमिनीवर आडवे व्हावे, सरळ असावे. तुमची मान आणि पाठ सरळ ठेवा आणि किंचित वेगळेपणाचा अनुभव घ्या. हात शरीराच्या बाजूला असावे, तळावे वरच्या दिशेला असावे. हे योगासनांच्या क्रमातील शेवटचे आसन आहे. स्नायू आणि शरीर संपूर्ण शिथिलीकरण होण्याकरिता या स्थितीत किमान पाच मिनिटे राहावे. (Muscle Pain)

‘हे’ पण वाचा :-

10 Psychological Tips For Fitness: व्यायाम करायचाय पण कंटाळा खूप येतो..? मानसशास्त्रात सांगितलेत उपाय; लगेच जाणून घ्या

मी फिट राहण्यासाठी जिम करू कि योगा? काय आहे सर्वोत्तम जाणून घ्या

डायबिटीज मध्ये ‘या’ आसनांचा करा वापर

‘कपोतासन’ करा आणि पाठदुखीपासून आराम मिळवा; जाणून घ्या