Stroke
|

Stroke: स्ट्रोक म्हणजे काय..? त्याचे प्रकार किती आणि कशी घ्याल काळजी..?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Stroke असे अनेक आजार आहेत ज्याबद्दल आपण ऐकून असतो पण ते नक्की काय आहेत याबाबत अनेकदा आपल्याला माहित नसते. अनेकदा अशा आजारांची पूर्ण माहिती नसल्यामुळे त्यापासून कसा बचाव करायचा हे देखील आपल्याला ठाऊक नसते.

परिणामी याची लक्षणे समजून न आल्यामुळे अनेक लोक अशा आजारांना बळी पडतात. अशाच समस्यांपैकी एक समस्या स्ट्रोक येणे हि आहे. याबद्दल तुम्ही ऐकले तर असाल पण याची पूर्ण माहिती तुम्हाला असेलच याची काही खात्री नाही. म्हणूनच आज आपण स्ट्रोकविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत.

० स्ट्रोक म्हणजे काय..?
(What Is Stroke..?)

जेव्हा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी ताण आल्यामुळे फुटते आणि रक्तस्त्राव होतो वा मेंदूला रक्त पुरवठा करण्यात अडथळा येतो तेव्हा स्ट्रोक (Stroke) येतो. या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्त पुरविणाऱ्या नसांचे नुकसान होते. तसेच मेंदूला योग्य रक्तपुरवठा होत नाही. शिवाय ऑक्सिजन मेंदूच्या ऊतींपर्यंत पोहोचण्यापासून रोखला जातो.

तज्ञांच्या रिपोर्टनुसार, USA मध्ये सर्वाधिक मृत्यू स्ट्रोक या कारणामुळे होत आहेत. साहजिकच ऑक्सिजनशिवाय, मेंदूच्या पेशी आणि ऊतींचे नुकसान होते. ज्यामुळे मृत्यू होण्याची संभाव्यता नाकारता येत नाही.

० स्ट्रोकचे प्रकार किती आणि कोणते..? (Stroke)

स्ट्रोकचे 3 प्राथमिक प्रकार आहेत:

१) ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA – Transient ischemic attack) –
यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात आणि यामुळे अटॅक येतो. हि पूर्ण स्ट्रोक येण्याआधीची पाहिली पायरी आहे.

२) इस्केमिक स्ट्रोक (Ischemic stroke) –
यामध्ये धमनीच्या गुठळ्या होतात किंवा प्लेकमुळे शारीरिक क्रियांमध्ये अडथळा येतो. हा अतिशय गतीने येणारा स्ट्रोक आहे. याची लक्षणे जास्त काळ टिकतात वा कायमस्वरूपी राहतात. (Stroke)

३) हेमोरेजिक स्ट्रोक (Hemorrhagic stroke) –
मेंदूत शिरणारी रक्तवाहिनी फुटल्यामुळे किंवा गळतीमुळे हा स्ट्रोक येतो.

० स्ट्रोकची प्रमुख लक्षणे

(Stroke) स्ट्रोक अतिशय गंभीर समस्या आहे. ज्या व्यक्तीला स्ट्रोक येतो त्याच्या शारीरिक बदल, हालचाली आणि लक्षणांमधून जाणवल्यास त्वरित वेगाने कृती करणे आवश्यक असते. कारण स्ट्रोक नंतरचे क्षण ‘गोल्डन अव्हर्स’ म्हणून ओळखले जातात. स्ट्रोकमध्ये प्रामुख्याने मेंदूतील रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदूतील ऊतींचे नुकसान होते.

स्ट्रोकची कोणतीही लक्षणे मेंदूच्या खराब झालेल्या भागांद्वारे नियंत्रित शरीराच्या अवयवांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. स्ट्रोक झालेल्या व्यक्तीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. कारण जितकी व्यवस्थित काळजी घायल तितका चांगला परिणाम आणि प्रगती रुग्णात दिसून येते. मात्र यासाठी आधी स्ट्रोकची लक्षणे माहित करून घेणे आवश्यक आहे. (Stroke)

१) अर्धांगवायूचा झटका येणे

२) चेहरा, हात, पाय आणि विशेषत: शरीराच्या एका बाजूला सुन्नपणा वा अशक्तपणा येणे

३) पीडित व्यक्तीस बोलण्यात वा समजण्यात अडचण येणे (Stroke)

४) गोंधळ, दिशाभूल किंवा प्रतिसादाचा अभाव जाणवणे

५) रुग्णाच्या शारीरिक हालचाली आणि वर्तनातील विशेष बदल होणे

६) दृष्टी अंधुक होणे

७) चालण्यात अडचण येणे आणि संतुलन गमावणे

८) चक्कर/ भोवळसह उलट्या होणे (Stroke)

९) अचानक तीव्र आणि असह्य डोकेदुखी होणे

१०) अंगात फेफरे भरणे. आकडी येणे

० जेव्हा स्ट्रोक येतो तेव्हा BE FAST..

जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक येतो तेव्हा दरम्यानचा वेळ अतिशय महत्वाचा असतो. कारण स्ट्रोक जितक्या लवकर ओळखला जाईल रुग्णाला तितक्या लवकर उपचार सुविधेपर्यंत पोहचवणे सोपे होते. दरम्यानचा दोन ते तीन तासांचा कालावधी हा ‘गोल्डन अवर’ असल्याचे म्हटले जाते. कारण या कालावधीत योग्य उपचार दिल्यास मेंदूच्या पेशींना कमी नुकसान होते.

(Stroke) काहीवेळा रुग्ण ‘ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक’नंतर अनेक दिवसांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो, या कालावधी स्ट्रोक पूर्ण विकसित झालेला असतो. म्हणूनच स्ट्रोक वेगाने समजणे महत्वाचे आहे. याला डॉक्टरांच्या भाषेत “FAST” असा शॉर्ट कोड वापरलेला आहे.

FACE (चेहरा) : व्यक्तीला हसायला सांगा आणि चेहऱ्याची एक बाजू ढासळते का ? ते पहा.

ARM (हात) : व्यक्तीला दोन्ही हात वर करायला सांगा आणि एक हात खाली पडतो का ? ते पहा. (Stroke)

SPEECH (बोल) : व्यक्तीला एक साधे वाक्य बोलण्यास सांगा. त्याचे शब्द अस्पष्ट आहेत का? ते पहा. शिवाय तो/ती वाक्य बरोबर पुनरोच्चार करू शकतो का? ते हि पहा.

यापैकी कोणतीही समस्या आढळल्यास T for TIME ला सुरुवात झाल्याचे समजून जा

TIME (वेळ) : यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात घेऊन जा. ही लक्षणे कधीही, कुठेही आणि अचानक उद्भवतात. यामुळे सतर्कता महत्वाची आहे.

० स्ट्रोक आल्यास काय होते.?

स्ट्रोक आला आणि तो योग्य वेळी समजला नाही तर खालील परिणाम होऊ शकतात:
मेंदुला दुखापत
दीर्घकालीन अपंगत्व
मृत्यू
(Stroke)
यामुळे स्ट्रोकचा सामना करताना अती सावधगिरी बाळगणे चांगले आहे. म्हणूनच स्ट्रोकची चिन्हे वेळीच ओळखा आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत घेण्यास घाबरू नका. यासाठी तुम्हाला किंवा इतर कोणाला स्ट्रोक आल्याचे निदर्शनास आल्यास 911 वा स्थानिक आपत्कालीन सेवांवर कॉल करा.

० स्ट्रोक येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल..?

स्ट्रोक (Stroke) येऊ नये यासाठी सुव्यस्थित जीवनशैलीचा अवलंब करा. यामध्ये खालील घटकांचा समावेश राहील.

१) आपल्या आहार संतुलित आणि पौष्टिक असण्यावर भर द्या. आहारात कोणतेही तेलकट, तिखट, आंबट, गोड, खारट अशा चवीचे पदार्थ खाऊ नका. तर आहारात फळे, भाज्या, सुका मेवा आणि भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करा.

Food

२) अति मीठ, अति चरबीयुक्त पदार्थ, ट्रान्स फॅट्स, कोलेस्टेरॉल आहे घटकांपासून दूर रहा. उलट घरगुती आहार घ्या आणि चांगल्या सवयीचे पालन करा. (Stroke)

३) निष्क्रियता किंवा व्यायामाचा अभाव यामुळेदेखील स्ट्रोक येऊ शकतो. म्हणूनच नियमित किमान ३० मिनिटे हलका व्यायाम करा.

४) दारू आणि सिगारेट तसेच निकोटिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे बंद करा. कारण यामुळेदेखील स्ट्रोकचा धोका जास्त प्रमाणात वाढतो. जास्त अल्कोहोल रक्तदाब वाढवतो. यामुळे ट्रायग्लिसराइड पातळी वाढते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस होते.

Smoking

रक्तवाहिन्या अरुंद करणार्‍या धमन्यांमध्ये हा प्लाक तयार होतो. शिवाय तंबाखूचा कोणत्याही स्वरूपात वापर केल्याने रक्तवाहिन्या आणि हृदयाला नुकसान पोहोचते. निकोटीनमुळे रक्तदाबही वाढतो.

५) स्ट्रोक येण्यामागे कौटुंबिक इतिहास देखील कारणीभूत असू शकतो. -यामुळे इतर कोणतेही विचार करण्याआधी वैद्यकीय तपासणी जरूर करून घ्या.

० स्ट्रोक टाळता येईल..?

जीवनशैलीतील काही महत्वाचे बदल केल्यास (Stroke) स्ट्रोकची शक्यता कमी करता येते मात्र स्ट्रोक टाळू शकत नाहीत. पण निश्चित स्वरूपात स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी वाईट सवयींची साथ सोडणे फायद्याचे आहे.

‘हे’ पण वाचा :-

बाथरूम स्ट्रोक म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीसाठी टिप्स

Cholesterol Control : ‘हे’ पदार्थ करतील बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल; जाणून घ्या

‘ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर’ म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

रक्ताभिसरणास सहाय्यक क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय?; जाणून घ्या

Clay Pot Water Benefits: उकाड्यात माठातले पाणी पिताय..? तर ‘हि’ माहिती जरूर वाचा